जनतेज न्युज

अंबानी स्फोटक प्रकरणाचे धागेदोरे मातोश्रीवर, नवनीत राणा यांचा गंभीर आरोप

प्रतिनिधी , अमरावती :- प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी आढळल्यानंतर मनसुख हिरेन यांच्यावर दवाब आणून शेवटी त्याची हत्या करण्यात आली. याचा सूत्रधार सचिन वाझे हा वादाच्या भोवऱ्यात असतांना तोच चौकशी अधिकारी करीत होता. ज्यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या रक्षणासाठी चर्चा केली असतांना त्याच्यावर राज्यसरकार बोललं नाही.

याउलट राज्य सरकार मधील मुख्यमंत्री त्याला सहकार्य करीत होते. त्यामुळे अमरावती जिल्हाच्या खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे NIA कडून चौकशी करण्याची मागणी केली तसेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची देखील मागणी केली. तेव्हा सत्य समोर यायला लागलं. NIA ने चौकशी सुरू झाल्यानंतर याची सर्व धागेदोरे हे मातोश्रीकडे वळताना दिसत आहेत. अस वक्तव्य अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे. नवनीत राणा यांनी या प्रकरणावरून पुन्हा एकदा ठाकरे सरकारला लक्ष केलं आहे.