प्रतिनिधी, नवी मुंबई – खास चहा आणि इतर पदार्थात आल्याचा वापर सर्रास होतो, आता याच आल्याचे दर नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात 15 ते 20 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे ग्राहक आल्याची खरेदी कमी करत आहेत. रोजच्या रोज आल्याचे दर वाढत चालले असून, याचा परिणाम सामान्य ग्राहकांच्या खिशाला होत आहे, अनेक वस्तूवर भाव वाढत असताना आलं ही महागल्याने गृहिणीचे बजेट कोलमडल्याचे चित्र आहे.
