प्रतिनिधी, भिवंडी – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आणि राज्यातील राजकीय रणधुमाळी सुरुवात झालेली आहे. महाविकास आघाडी महायुती यांच्याकडून अजूनही जागावाटप जाहीर होत नसतात काँग्रेस पक्षाकडून इच्छुक म्हणून प्रबळ दावेदारी करणारे काँग्रेस पक्षाचे भिवंडी जिल्हा उपाध्यक्ष निष्ठावंत पदाधिकारी म्हणून ओळखले जाणारे रमाकांत भोई यांनी भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात आपण प्रबळ दावेदार असून काँग्रेस पक्ष माझ्यासारख्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचा नक्कीच विचार करेल असा विश्वास रमाकांत होईल भोई यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.
भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा दावा केल्याने सध्या पेच निर्माण झालेला आहे. या वर बोलताना रमाकांत भोई यांनी काँग्रेस पक्षाचा परंपरागत मतदारसंघात असलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात तब्बल पाच वेळा काँग्रेस पक्षाचे दामोदर शिंगडा पाच वेळा तर एकदा सुरेश टावरे निवडून आले. तरीसुद्धा शरद पवार यांच्या हट्टापायी काँग्रेस पक्षाने मोठे मन करून भिवंडी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिला. त्यांनी भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघावर दावा करणे चुकीचे आहे. काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्या 18 इच्छुक उमेदवारांमध्ये आपण काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत असून खासदार पद भोगलेले दोन वेळा आमदार पद भोगलेले हे सुद्धा या इच्छुकांच्या रांगेत आहे. पण मी चाळीस वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत कधीच काँग्रेस पक्षापासून दूर गेलो नव्हतो त्यामुळे पक्ष श्रेष्ठी आपणास उमेदवारी देतील असे सांगत भाजपा आमदाराने दहा वर्षे सत्तेत असून ही शहराच्या विकासासाठी काही ही काम केले नसून आता यांना जाग आली आहे. म्हणून निवडणुकीच्या तोंडावर भाजपा आमदार गल्लोगली रस्ते बनवत असल्याचे भासवत नारळ फोडत आहेत अशी टीका भाजपा आमदारावर रमाकांत भोई यांनी केली आहे.
