प्रतिनिधी , डोंबिवली: 13 वर्षीय मुली सोबत इंस्टाग्रामवर मैत्री केली नंतर तिला पळवून नेल्याची घटना डोंबिवलीत घडली होती .या प्रकरणी विष्णूनगर पोलीसानी गुन्हा अक्षय महाडिक याला भिवंडी हुन अटक करत मुलीची सुखरूप सुटका केलीय .
सदर पीडित मुलगी 20 सप्टेंबरला क्लास साठी गेली होती ती घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी विष्णुनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. तांत्रिक तपास व बातमीदार यांच्या मार्फत मुलीचे अपहरण करणाऱ्या महाडिक याला पोलिसांनी ठाणे येथून अटक केले. पोलिसांनी भिवंडीतील काल्हेर गावातल्या तेजस्विनी आर्केड इमारतीतल्या आरोपीच्या फ्लॅटमध्ये कोंडलेल्या मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर या मुलीला तिच्या पालकांच्या सुपूर्द करण्यात आले आरोपीच्या विरोधात याप्रकरणी अपहरण विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील 13 वर्षीय तक्रारदार मुलीशी आरोपीची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यातून या मुलीशी जवळीक साधल्यानंतर आरोपीने तिला फूस लावून पळवून नेले. आरोपी अक्षय महाडिक हा सीसीटीव्ही सिस्टीम, कॉम्प्युटरमध्ये एक्सपर्ट असल्याने तो सोशल मिडिया माध्यमांमध्येही तरबेज आहे. त्यामुळेच त्याने इंस्टाग्रामच्या माध्यमातून मुलीशी जवळीक साधली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
