प्रतिनिधी , अमरावती : केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालया समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करुण आंदोलन कर्त्यांनी जिओच्या सिम कार्डची होळी करत केंद्र सरकार व अदानी अंबानी या उद्योगपती विरोधात घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला..कृषी विधेयक हे उद्योगपती यांच्या हिताचे आहे त्यामुळे अदानी अंबानी यांच्या कंपनीला देखील विरोध अमरावती जिल्ह्यातुन होत आहे,त्यामुळे केंद्र सरकारने लुटण्यासाठी हा कायदा केल्याचा आरोप यावेळी वंचित आघाडीने केला आहे
