प्रतिनिधी , अमरावती : लॉक डाऊन च्या काळात सर्वसामान्य माणसांना अव्वाच्या सव्वा विज बिले आल्याने वीज वितरण कंपनीच्या विरोधात आता आक्रोश निर्माण होत आहे. आज अमरावती वीज वितरण कंपनीच्या विरोधात माजी कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे व भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे यांच्या नेतृत्वात अमरावतीच्या महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं,यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलाने बदडले, संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी या वेळी वीज कार्यालयाचा पुरवठा देखील खंडित केला.सर्वसामान्यांना वीज वितरण कंपनी अंधारात ठेवत असेल तर या अधिकाऱ्यांना देखील आम्ही अंधारात बसून वयानंतर विज मंत्री व सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या घरातला वीजपुरवठा खंडित करू असा इशाराही माजी मंत्री डॉ अनिल बोंडे यांनी दिला
