प्रतिनिधी , नंदुरबार : नंदुरबार आज रात्री पासून आलेल्या अचानक पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे .गेल्या दोन दिवसापासून शहरासह जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण होते.काल थोड्या प्रमाणात पाऊस पडला . पण काल रात्री पासून नंदुरबार शहरात तसेच जिल्ह्यात काही भागात अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली .या आलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे .त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.. दादर, कापूस ,पपई, तसेच भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे .कोरोना आजरामुळे आधीच शेतकऱ्यांचे जीवनमान खराब झाले आहे आणि आता हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावुन नेल्याने शेतकरीं चिंताग्रस्त झाला आहे तरी शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्यांची शेतीची पंचनामा करून त्वरित भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे..
