जनतेज न्युज

आजपासून श्री विठ्ठलाचे ऑफलाईन दर्शन मिळणार आहे

प्रतिनिधि , पंढरपुर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 17 मार्च पासून बंद असलेले विठ्ठल मंदिर 16 नोव्हेंबर दिवाळी पाडव्याच्या दिवशी दर्शनासाठी खुले करण्यात आले. कोरोनाचे नियम पाळत दररोज ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या 2 हजार भाविकापासून सुरू झालेली दर्शनाची सोय 19 जानेवारी पर्यंत 8 हजारांवर पोहचली होती. मात्र ऑनलाईनीला भाविकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने मंदिर समितीने 11 जानेवारीच्या बैठकीत ऑफलाईन दर्शन सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र दहा वर्षांखालील आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या भाविकांना दर्शन मिळणार नाही. कोरोनाचे सर्व नियम पाळून ही दर्शन व्यवस्था करण्यात आलीय. भाविकांचे ओळखपत्र पाहून मंदिरात सोडण्यात येणार आहे. ऑनलाईन नोंदणी दर्शनाचा पर्याय देखील मंदिर समितीने सुरू ठेवलाय. ऑफलाईन दर्शन सुरू झाल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.