प्रतिनिधी , सांगली : सोमवारी विविध मागण्यांसाठी पालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता.मात्र प्रशासनाकडून मागण्यांच्या बाबतीत दुर्लक्ष करण्यात आल्याने भाजीपाला विक्रेत्यांना शिवसेना नेत्यांनी पालिकेच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला कालपासून सुरूवात केली आहे.तसेच या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सांगली शहरात या भाजीपाला विक्रेत्यांनी भाजीपाला विक्री व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सांगली महापालिका प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत सांगली महापालिका क्षेत्रातल्या फेरीवाला हातगाडी,भाजी विक्रेत्यांना परवाने व ओळखपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मात्र हे परवाने देत असताना पालिका प्रशासनाकडून उपयोग कर, लावून एक हजार रुपये शुल्क घेऊन परवाने देण्याची प्रक्रिया राबवण्यात येत आहे.आणि याला शिवसेना आणि जनसेवा फळे, भाजीपाला विक्रेता संघटनेने विरोध दर्शवत,नोंदणी झालेल्या फेरीवाले, हातगाडी आणि भाजी विक्रेत्यांना विनाशुल्क परवाने व ओळखपत्र देण्याच्या मागणीसाठी सोमवारी सांगली महापालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता.मात्र मागण्यांच्या बाबतीत पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करत शिवसेना आणि जनसेवा फळे ,भाजीपाला आणि खाद्य विक्रेते संघटनेकडून महापालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आला आहे.सोमवारी सायंकाळी असून याबाबत बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली आहे.
