प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली: कधी काळी हॉटस्पॉट असणाऱ्या कल्याण डोंबिवलीतील कोरोनाचा आलेख सध्या लक्षणीयरीत्या खालावल्याचे सकारात्मक दृश्य असताना दुसरीकडे बदलत्या हवामानामुळे व्हायरल तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसत आहे. एकीकडे कोरोनाचे सावट कायम असताना व्हायरल ताप कल्याण डोंबिवलीकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या जून, जुलै ,ऑगस्ट महिन्याचा आढावा घेता अवघ्या 3 महिन्यात या व्हायरल तापाचे तब्बल 3 हजार 800 रुग्ण आढळून आले आहेत. त्याचजोडीला डेंग्यूचे 10, लेप्टोचे 9, मलेरिया 57 आणि स्वाईन फ्लूचा 1 रुग्ण देखील आढळला आहे तर या बाबत पालिका प्रशासन सज्ज झाले असून ताप सदृश्य लक्षण आढळल्यास ‘ताप अंगावर काढू नका’ तातडीने डॉक्टरचा सल्ला घेत उपचार घ्या अस आवाहन केडीएमसी प्रशासनानं केलं आहे
