जनतेज न्युज

आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घ्या… महाराष्ट्र राज्य कोविड योद्धा कर्मचारी संघटनेची मागणी…

प्रतिनिधी , कोरोना संकटात जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्या कोरोना योद्ध असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेतून कमी करण्यात आले आहे. कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू करून घ्यावे तसेच त्यांना शासकिय नोकरीत कायमस्वरुपी प्रथम प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी आज महाराष्ट्र राज्य कोवीड योद्धा कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने करण्यात आले.
गेल्या वर्षभर संपूर्ण देश कोरोना सारख्या भयानक महामारीशी लढत आहे. कोरोना आटोक्यात येताना दिसत असताना कोरोना काळात जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्या महिला परिचारिका, डॉक्टर, वार्ड बॉय यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर या सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रुजू करुन घ्यावे. त्यांना मानधन तत्त्वावर कायम करावे. वैद्यकिय सेवेमधील शासकीय नोकरभरतीमध्ये या कोरोना योद्धयांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. अशा विविध मागण्यां घेऊन महाराष्ट्र राज्य कोविड योद्धा कर्मचारी संघटनेच्या वतीने हे निदर्शने करण्यात आली असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.