प्रतिनिधी, जळगाव : देशातील वाढत्या इस्लामिक जिहादी कट्टरता आणि हिंसाचाराच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, यासाठी आज विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तर्फे आज पाचोरा प्रांताधिकारी विक्रम बांदल यांना निवेदन देण्यात आले आहे.
गेल्या काही काळापासून देशभरात इस्लामिक जीहादी कट्टरता वाढत आहे. हिंदूंवर योजनापूर्वक हल्ले होत आहेत. हिंदूंची घरे दुकाने आणि वाहने जाळण्यात आली. तसेच सरकारी मालमत्ता आणि मंदिराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशातील हिंदू समाज दुखावला असून संतप्त झाला आहे देशभरातून हिंदू समाज या घटनेविरोधात धरणे आणि निवेदनाद्वारे तीव्र संताप व्यक्त करीत आहे. त्यामुळे जिहादी भाषणे देण्याऱ्या व्यक्तींना ताबडतोब थांबवावे, दंगल घडवणाऱ्या दंगेखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
देशात अलीकडेच घडत असलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या कारणावरून आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे निषेध करण्यात आला. या प्रकरणी हिंसाचार घडविण्याचा कट असून यात संपूर्ण देशाला वेठीस धरण्यात येत असून या समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. या अनुषंगाने आज पाचोरा उपविभागीय प्रांताधिकारी विक्रम बांदल यांना यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महावीर गौड प्रखंड मंत्री अतुल पाटील, अभिषेक पाटील, दीपक पाटील, योगेश पाटील, पप्पू चौधरी, धनराज भोई, योगेश भोई, तनवीर परदेशी, सचिन येवले, शुभम पाटील आदी उपस्थित होते.
