जनतेज न्युज

ई चलान चा दंड चुकव्यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू थकीत दंड भरा अन्यथा कारवाई अटळ – वाहतूक पोलिसांचा इशारा

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकान ई-चलन पाठवण्यात आले आहे. मात्र बहुतांश वाहनचालक इ चलान द्वारे आकरण्यात येणारा दंड भरण्याची तसदी घेत नाही या दंड चुकव्यांवर कारवाईसाठी वाहतूक पोलीस सरसावले असून कल्याण डोंबिवली शहरात नियमितपणे नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे .शहराच्या प्रवेशद्वारावर दुर्गाडी नाका,शहाड, पत्रिपुल या ठिकाणी वाहतूक पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले असून दंड
चुकवणारया वाहनावर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे .याबाबत कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी कारवाई टाळण्यासाठी थकीत दंडधारकांनी जवळच्या वाहतूक शाखेत दंड भरावा ,अन्यथा ऑनलाइन दंड भरावा असे आवाहन केलं आहे