जनतेज न्युज

उच्च प्राथमिक शाळेची चौकशी करून कारवाई करा- भीम आर्मीची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

प्रतिनिधी, वर्धा : दहेगांव धांदे येथील उच्च प्राथमिक शाळे मध्ये माधुरी रंगारी ही खिचडी बनविण्याकरीता मागील 10 वर्षापासून बचत गटातर्फे नियुक्ती करण्यात आली होती. त्याच शाळेत मुख्याध्यापिका पदावर असलेल्या यांनी माधुरी रंगारी हिला खिचडी बनविण्याकरीता लागणारे साहित्य जसे तिखड मिठ, हळद, तसेच इतर सामान हे एक्सपायर झालेले म्हणजेच निष्कामी झालेले दिले असता तिने मनाई केली व म्हणाली की मी शाळेतील मुलांच्या आरोग्या सोबत धोका करू शकत नाही. मला चागंले साहित्य उपलब्ध करून दयावे या कारणावरून त्यांचे वाद झाले व माधुरी रंगारी हिचा दोन्ही पदाधिकारींनी व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता कोणतीही मिटींग व प्रस्ताव न घेता त्यांच्या पदाचा दुरूपयोग करून तिला शाळेतुन काढले. तसेच काही दिवसांनी सदर वाद हा इतका निकोपास गेला की, माधुरी रंगारी हिच्या रागावरून तिच्या मुलीला सुद्धा मानसिक त्रास देवून शाळेतुन काढण्यात आले असल्याचे निवेदन आज दिनांक 8 जून रोजी पुलगाव भीम आर्मीच्या वतीने शेकडो ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन दिले,यावर जिल्हाधिकारी यांनी सदर शाळेवर चौकशी करण्याचे समनधित विभागाला निर्देश दिले,असून शिक्षणाधिकारी यांनी तसे आदेश देऊन चौकशी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.यावेळी पुलगाव भीम आर्मीचे अध्यक्ष अंकुश कोचेसह इतर पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.