जनतेज न्युज

उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्यास महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा कॉचींग क्लासेस असोसिएशन च्या वतीने देण्यात आला.

प्रतिनिधी , औरंगाबाद : कोचिंग क्लासेस असोसिएशनने घालून दिलेल्या नियमावलीचे तंतोतंत पालन करून सुद्धा मनपाचे पथक क्लोजिंग क्लास वर मनमानी पद्धतीने सक्त दंड वसूल करत असल्याचे आरोप पत्रकार परिषदेमध्ये कॉचींग क्लासेस असोसिएशन ने केले आहे.
तसेच या रजाकारी पद्धतीने सुरू असलेल्या कार्य वाही बाबत फेर विचार करावा अन्यथा आम्हाला सहकाराचे शस्त्र उपसायला भाग पडू नये असा इशारा शासनाला दिला
कोविंड 19 च्या पार्श्वभूमीवर 14 मार्च 2020 पासून तब्बल बारा महिन्यापासून संपूर्ण राज्यभर तसेच आपल्या औरंगाबाद शहरात कोचिंग क्लासेस बंद होते परंतु 15 फेब्रुवारी 2021 पासून शहरातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे कोचिंग क्लासेस सुरू करण्यासंबंधी परवानगी दिली होती परंतु लगेच 16 फेब्रुवारीपासून मनपाच्या वतीने कोचींग क्लासेस वर कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई सुरू केली जाते याचा अर्थ केवळ आर्थिक वसुलीसाठी क्लासेस ला परवानगी दिली जाते का असा सवाल कोचिंग क्लासेस असोसिएशनने पत्रकार परिषदेत केला आहे