जनतेज न्युज

उध्दव ठाकरेंना पाठींबा देन्यासाठी संगमनेरमध्ये शिवसैनिक ऐकवटले

प्रतिनिधी, अहमदनगर : ऐकनाथ शिंदेसह ४० आमदारांनी शिवसेनेबरोबर बंडखोरी केल्या नंतर आज संगमनेर तालुक्यातील शिवसैनिक मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पाठींबा देन्यासाठी संगमनेरमध्ये ऐकवटले आहे. शिवसेनेचा विजय असो तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो तसेच हिंदुऋदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो अशा घोषना आज शिवसैनिकांनी संगमनेर मध्ये दिल्या आहेत.यावेळी शिर्डी येथील निषेध मोर्चासाठी संगमनेर तालुक्यातील शेकडो शिवसैनिक रवाना झाले आहेत.यावेळी शेकडो शिवसैनिक ऐकत्र येत उध्दव ठाकरेंना पाठींबा देन्यासाठी ऐकवटले आहेत.यावेळी आपल्या भावना त्यांनी व्यक्त केला आहे.