जनतेज न्युज

उल्हास नदी पात्रात गेल्या आठ दिवसापासून आंदोलन सुरु

प्रतिनिधी , कल्याण : उल्हास नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदी पात्रात आंदोलन करणाऱ्यांची प्रशासनाने अद्याप दखल घेतलेली नाही. तर दुसरी कडे प्रशासनाच्या विरोधात अनेक संघटना राजकीय पक्ष दखल न घेणाऱ्या अधिकारी वर्गाचा निषेध करीत वेळ प्रसंगी रस्त्यावरुन उतरुन आंदोलन करण्याचा इशारा देत आहे. त्यातच नदीच्या विषयावर सेना-मनसे आमने सामने आल्याने येत्या निवडणूकिच्या पश्यभूमीवर नदीचा विषय चांगलाच गाजणार आल्याचे चित्र दिसून येत आहे.
उल्हास नदी पात्रात गेल्या आठ दिवसापासून ‘मी कल्याणकर’ या संस्थेकडून प्रदूषण रोखण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. गेल्या काही वर्षापासून वारंवार मागणी करुन नदीचे प्रदूषण रोखले जात नाही. नाल्यांचे सांडपाणी थेट नदी पात्रात सोडले जात आहे. त्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. यासाठी समाजिक कार्यकर्ते नितिन निकम, कैलास शिंदे, उमेश बोरगावकर यांनी उपोषण सुरु केले आहे. मात्र याच्या आंदोलनांकडे पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने अनेक संघटना व राजकीय पक्षांनी नाराजगी वैक्त केली आहे.
तर या बाबत आमदार खासदार बरोबर बैठक झाली असून पालिका प्रशासन चे 65 % काम झाल्याचे पालिका आयुक्त याचे म्हणणे असून लवकरच आंदोलनकर्त्या बरोबर चर्चा करणार असल्याचे पालिका आयुक्तांने सांगितले.तर याबत मनसे आमदार राजू पाटील यांनी कामासाठी आवश्यक असलेली जागाही अद्याप महापालिकेच्या ताब्यात नसल्याची धक्कादायक माहिती दिली असून कल्याण डोंबिवली महापालिकेने दिलेले आश्वासनात काही एक तथ्य नाही नसल्याचे सांगितले.
नदी पात्रला मिळणारे सहा नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलून ते एसटीपी जोडले जातील. त्याचे काम ६० टक्के पूर्ण झालेले असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.एकीकडे प्रशासनाच्या विरोधात अनेक संघटना राजकीय पक्ष दखल न घेणाऱ्या अधिकारी वर्गाचा निषेध करत असले तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून नदीचा विषय चांगलाच गाजणार आल्याचे चित्र दिसून येत आहे.