जनतेज न्युज

एका दहा वर्षांच्या चिमुकलीने धरले पूर्ण महिन्याचे रोजे.

प्रतिनिधी , अहमदनगर : मुस्लिम बांधावात रमजान महिना हे खूप पवित्र मानले जाते, या महिन्यात उपवासाला खूप महत्व दिले जाते, प्रत्येक व्यक्ती उपवास धरतो, लहान असो की मोठे सर्व जण उपवास धरतात. या वर्षी रमजान महिना भर उन्हाळ्यात आल्यामुळे तरुण व्यक्तींना उपवास धरणे कठीण होत असताना कोपरगाव शहरातील इंदिरानगर भागात राहनारी आलिया जाविद शेख या 10 वर्षीय चिमुकलीने पूर्ण एक महिन्याचे उपवास धरून देशाला कोरोना सारख्या संकटा पासून सुरक्षित ठेवन्यासाठी प्रार्थना केली, तसेच मुस्लिम समाजतील युवक वर्गाला धर्माचे आदेशाचे पालन करण्याचे सल्ला दिला आहे.