सीसीटीव्ही च्या माध्यमातून कल्याण क्राइम ब्रांचने भामट्याला ठोकल्या बेड्या
प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : डोंबिवली येथील नार्वेकर ज्वेलर्स च्या दुकानात सोन्याचे दागिने खरेदी करून दुकानदाराला ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केल्याचे खोटे मेसेज दाखवुन सोनाराकडून सव्वा चार लाखाचे सोने घेऊन पसार झालेल्या भामट्याला कल्याण क्राइम ब्रांचने सीसीटीवी फुटेज व मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण करून 24 तासाच्या आत अंबरनाथ येथून बेड्या ठोकल्या . पोलिसांच्या माहितीनुसार विनय लोहिरे असे या भामट्याच नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे त्याच्याविरोधात याआधी देखील पुणे व ठाणे येथे अनेक गुन्हे दाखल आहेत .
