जनतेज न्युज

कर्जमाफी मिळावी यासाठी महिला शेतकरीचे आज पासून आमरण उपोषण सुरू

प्रतिनिधी, धुळे : शिरपूर तालुक्यातील उंटावद येथील महिला शेतकरी यांना कर्जमाफी झाली नसल्याने त्या आज २ मार्च पासून शहरातील सहाय्यक निबंधक कार्यालया समोर आमरण उपोषणला बसले आहेत.

 उंटावद येथील शांताबाई धुडकू महाजन यांनी २०१४ मध्ये शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र मधून १ लाख ४६ हजार रुपये पीककर्ज घेतले होते. त्या कर्जमाफी पात्र होत्या.त्यांनी कर्जमाफी मिळणेसाठी ऑनलाइन अर्ज केलेला होता. तरी त्यांना कर्जमाफी मिळाली नाही.असे त्यांचे म्हणणे आहे.

महाजन   शिरपूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र कडून कर्ज घेतले आहे. तर तालुक्यातील दुसऱ्या कोणत्याही  शाखेतून कर्ज घेतलेलेच नाही.त्या इतर ठिकाणी खातेदार ही नाहीत. तरीही त्यांच्या  नावाचे खाते अर्थे  येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथे कसे काय उघडले गेले ? बोगस खाते कसे काय सुरू ठेवले ? यामुळे त्यांना कर्जमाफी पासून वंचित ठेवलेले आहे. किंवा त्यांच्या नावे अन्य कोणीतरी कर्जमाफी चा लाभ घेतलेला आहे.असा त्यांना संशय आहे.

 त्या अशिक्षीत महिला शेतकरी असून त्यांच्या  शिरपूर येथील खात्यातून परस्पर १ लाख रूपये कर्ज कपात केली. त्याबाबत त्यांना कोणतीही सुचना दिली नाही. नंतर पुन्हा २८  हजार रूपये परस्पर कर्ज कपात केली. त्यांना  कोणतीही सुचना केली नाही. सदर बाब सहाय्यक निबंधक व बँक मैनेजर यांच्या निदर्शनास त्यांनी  आणून दिली आहे. त्यावर कोणतीही कारवाई केल्याचे त्यांना कळवलेले नाही.

    यात   बोगस खाते उघडणे, बेकायदेशीर रक्कम  कपात करणे याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात  यावा. तसेच  कर्जमाफी मिळावी यासाठी सहाय्यक निबंधक कार्यालय शिरपूर समोर त्या दिनांक २ मार्च पासून आमरण उपोषणला बसले आहेत