जनतेज न्युज

कर्मचारी संघटनेचे विविध मागण्यांसाठी घाटी रुग्णालय परिसरात अमरण उपोषण सुरू

प्रतिनिधी, औरंगाबाद : शहरातील शासकीय घाटी रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीसमोर आज कर्मचारी संघटनेच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अर्चना निलेश बनसोडे यांच्या पतीचे कोणामुळे निधन झाले होते. ती घाटी रुग्णालयात शासकीय कर्मचारी असताना वारसा हक्क प्रमाणे त्यांच्या पत्नीला नोकरी मिळावी यासाठी अर्ज करण्यात आला होता मात्र अर्चना यांच्या सासूला नोकरी देण्यात आली होती यासाठी संघटनेच्या वतीने तक्रार देण्यात आली होती या संदर्भात एक चौकशी समिती गठीत करण्यात आली होती सदरील चौकशी मध्ये तीन अधिकारी दोषी आढळून आले असून सदरील अर्चना यांच्या सासूला कामावरून कमी करून अर्चना यांना नोकरी देण्यात यावी असा आदेश सदर समितीने दिला होता. मात्र अजून सुद्धा अर्चना निलेश बनसोडे यांना नोकरी देण्यात आली नाही. तसेच करू नकळत अनेक शासकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या जागेवर ती त्यांच्या कुटुंबाला नोकरी देण्यात यावी अशी मागणी सदरील संघटनेच्यावतीने करण्यात आली असून मात्र या मागणीला प्रशासनाने केराची टोपली दिली आहे.सदरील मागण्या मान्य करण्यात यावा या मागणीसाठी घाटी रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारती समोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून आज उपोषणाचा दुसरा दिवस असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने आज रोजी देण्यात आला आहे.