प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : कल्याण पूर्वेतील ड प्रभाग कार्यालयानजीक उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पूर्णाकृती पूतळ्य़ाच्या कामाला येत्या महिन्याभरात सुरुवात केली जाईल अशी माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंती समितीचे पदाधिकारी विवेक जगताप यांच्यासह अन्य कार्यकर्तानी यासंदर्भात खासदार शिंदे यांची नुकतीच भेट घेतली होती. या भेटीपश्चात खासदार शिंदे यांनी जगताप यांच्यासह महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. रखडलेल्या पुतळ्य़ाच्या कामासंदर्भात खासदारांनी आयुक्तांसोबत चर्चा केली. या बैठकीनंतर खासदार शिंदे यांनी ज्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंब़ेडकरांचा पुतळा उभारला जाणार आहे. ती जागा खाजगी होती. त्या मालकाकडून ही जागा आत्ता महापालिकेस हस्तांतरीत करण्यात आली आहे. त्या जागेवर आरक्षण आहे. ते आरक्षण बदलाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे महापालिकेच्या माध्यमातून पाठवून ते आरक्षण बदलण्यात येणार आहे. त्याच प्रमाणो चार प्रकारच्या ना हरकत दाखल्यांची आवश्यकता होती. ते ना हरकत दाखले मिळविण्यात आालेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबडेकरांच्या पुर्णाकृती पुतळ्य़ाच्या कामासाठी एक कोटी 25 लाख रुपयांचा निधी लागणार आहे. हा निधीही उपलब्ध करुन दिला जाईल. येत्या महिन्याभरात पुतळा उभारण्याचे काम सुरु केले जाईल असे आश्वसन आयुक्तांनी दिल्याची माहिती खासदारांनी दिली आहे.
