प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली: कल्याण रेल्वे स्थानकावर गर्दुल्ल्यानी एकच उच्छाद मांडला असून हे गर्दुल्ले आता रेल्वे प्रवाशांना लुबाडत असल्याची घटना समोर येत आहे .अशीच एक घटना कल्याण रेल्वे स्थानकात घडली .रात्रीच्या सुमारास एक प्रवासी रात्री फलाटावर एक्स्प्रेसची वाट पाहत असताना त्याला डुलकी लागली प्रवासी गाढ झोपेत असल्याची संधी साधून काही गर्दुल्ल्यानी त्यांचा जवळील मोबाईल व रोकड चोरून पळ काढला .काही वेळाने जाग आल्यानंतर त्याला मोबाईल व रोकड चोरी गेल्याचे लक्षात आले त्याने तत्काळ या प्रकरणी कल्याण जीआरपी मध्ये तक्रार नोंदवली पोलिसांनी तत्काळ प्लॅटफॉर्म वरील सीसीटीव्ही तपासत आरोपींची ओळख पटवली व कमलकुमार ठाकूर ,मोहम्मद अन्सारी ,मुलायम यादव या तीन आरोपीना अटक करत मुद्देमाल हस्तगत केला असून या चोरट्याचा एक साथीदार पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
