जनतेज न्युज

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे नामांतर चालते पण संभाजीनगर नाही ? आचार्य तुषार भोसलेंचा बाळासाहेब थोरातांना जळजळीत प्रश्न

मर्दानगीच्या पोकळ भाषेपेक्षा नामांतर करुन खरी मर्दानगी दाखवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले आव्हान

प्रतिनिधी , औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याला आमचा विरोध आहे , असे म्हटलेल्या बाळासाहेब थोरातांना भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांना जळजळीत प्रश्न केला आहे की , “काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांचे मूळ नाव काय आहे, हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. त्यांचे नामांतर तुम्हाला चालते पण औरंगाबाद चे संभाजीनगर का नाही ?.
स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी नामांतराचा उपयोग करण्याचे धंदे काँग्रेसने बंद करावेत. त्यांचा इटालियन अजेंडा महाराष्ट्रात चालणार नाही. औरंगाबादचे संभाजीनगर झालेच पाहिजे”.
“लाचार झालेल्या शिवसेनेला , मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांना आणि त्यांचे संपादक संजय राऊत यांना माझे आव्हान आहे की मर्दानगी ची पोकळ भाषा करण्यापेक्षा त्यांनी संभाजीनगर, धाराशिव असे नामांतर करुन खरी मर्दानगी दाखवावी.” असे म्हणत त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही डिवचले आहे.