जनतेज न्युज

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न झाला तर तो सांभाळण्याकरिता पोलिस प्रसासन सक्षम आहे – नरेश मस्के माजी महापौर

प्रतिनिधी, ठाणे : ज्यात सत्तांतर झाल्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना गट व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट अनेकवेळा आमनेसामने आले आहेत. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवतिर्थावरुन बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात चांगलेच घमासान झाले होते. शिवतिर्थावर कोणाचा दसरा मेळावा होणार यावरुन दोन्ही गट न्यायालयाची पायरी चढले होते. त्यानंतर आता ठाण्यातही दिवाळी पहाटच्या निमित्ताने बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आमने सामने आल्याचे चित्र होते. ठाण्यातील तलाव पाळी परिसरात दिवाळी पहाट कार्यक्रम मागील दहा वर्षापासून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे हे साजरा करत आहेत. मात्र यावर्षी बाळासाहेबांची शिवसेना गटाकडूनही दिवाळी पहाटसाठी महापालिका आणि पोलिसांकडे अर्ज करण्यात आला होता. त्यामुळे यावर्षीची दिवाळी पहाट कार्यक्रम कोण साजरा करणार असा प्रश्न होता. मात्र आता न्यायालयाने याबाबत निर्णय दिला आहे.दरम्यान, या दिवाळी पहाट आयोजनास बाळासाहेबांची शिवसेना गटाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं ठाकरे गटाला उच्च न्यायालयाचा हा धक्का मानला जात आहे. ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजनावरून बाळासाहेबांची शिवसेना गट आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट उच्च न्यायालयात पुन्हा आमने सामने आले होते. ठाणे महानगरपालिकेने दिलेली परवानगी योग्य आहे, असं न्यायालयाने सांगितले. कार्यक्रमाला बाळासाहेबांची शिवसेना गटाला प्रथम प्राधान्य देण्यात आल्याने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मंदार विचारे यांची उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राजकीय हेतूने प्रेरित होऊन निर्णय घेतल्याचा याचिकाकर्त्यांच्या आरोप न्यायलयाने फेटाळला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न झाला तर तो सांभाळण्याकरिता पोलिस प्रसासन सक्षम आहेत. पोलिस बंदोबस्त असताना देखील आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शिंगावर घेऊ. मंदार प्रमोद विचारे याचिकाकर्ते हे राजन विचारे यांचे सख्ये पुतणे आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळं बाळासाहेबांची शिवसेना गटाने आनंद व्यक्त केला आहे.