प्रतिनिधी, गोरेगाव: पुजा पारकर यांचा पुत्र शिवम पारकर वय चार ते पाच वर्षे याला अचानक फिट आली असून त्याची दातखिळी बसल्यामुळे आई मदतीसाठी आरडाओरड करत होती.
त्यावेळी त्या वेळी येथून जाणाऱ्या सहाय्यक वाहतूक अधिकारी राजेश विचारे यांनी बस वाहक आप्पासाहेब लोहार आणि बसचालक किशोर दाणे यांना प्रसंगाचे गांभीर्य ओळखून सदर बस ठाकूर हॉस्पिटल येथे नेण्याचे आदेश दिले. त्यानुसार श्री लोहार आणि श्री दाणे यांनी तातडीने बस ठाकुर हॉस्पिटलला नेऊन शिवम पारकर याला उपचार देण्यासाठी मदत केली. वेळेत उपचार मिळाल्याने शिवम पारकर याला गंभीर दुष्परिणामांना सामोरे जावे लागले नाही आणि त्याचे प्राण वाचले.
याची दखल बेस्टचे महाव्यवस्थापक श्री लोकेश चंद्र यांनी घेतली आणि श्री लोहार आणि श्री दाणे यांचा कार्यालयात बोलावून विशेष सत्कार केला.
