प्रतिनिधी , मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आणि इंधन दरवाढीविरोधात शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदला कांग्रेसनं सक्रिय पाठिंबा जाहीर केला असुन शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या या बंदमध्ये सहभागी होत बुलडाण्यातील जयस्तंभ चौकात काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसने एकदिवसीय उपोषण सुरु केले आहेत.
शेतक-यांना उद्धवस्त करणारे काळे कृषी कायदे रद्द करावेत या मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमांवर मागील 110 दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलन काळात आतापर्यंत 300 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तरीही हे कृषी कायदे मोदी सरकारने रद्द केले नाहीत. कृषी कायद्यातील बदलांमुळे रेशनिंग बंद होणार आहे. त्यामुळे गोरगरिब जनता, कामगार वर्गावर उपासमारीची वेळ येणार आहे. मात्र मनमानी मोदी सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.त्याचबरोबर “पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसवर भरमसाठ कर लावून केंद्र सरकार दरोडा टाकत आहे. पेट्रोल 100 रुपये लिटर तर गॅस सिलिंडर 850 रुपये झाला आहे. महागाईनं लोकांचं जगणं कठीण होऊन बसलं आहे. कामगार कायद्यांतील बदलांमुळे कामगार देशोधडीला लागणार आहेत”. मोदी सरकारच्या या मनमानी व हुकुमशाहीचा विरोध म्हणुन राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भाई नगराळे यांच्या नेतृवात उपोषण सुरु केले आहे. यावेळी बुलडाणा राष्ट्रवादी कॉंग्रेस,बुलडाणा जिल्हा कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थीत होते..
