प्रतिनिधी , नाशिक : कोरोनाच्या महामारी मुळे गेल्या वर्षभरापासून ग्रामीण भागातील अनेक उत्सव,यात्रा,जत्रा सारखे होणारे कार्यक्रम रद्द झाले आहेत… त्यामुळे अनेक गोष्टींना याचा फटका बसत आर्थिक उलाढाल देखील ठप्प झाला आहे…या कोरोना च्या महामारी मुळे ग्रामीण भागात होणारे कुस्तीच्या स्पर्धा देखील रद्द झाल्याने अनेक कुस्तीपटू वर उपासमारीची वेळ आली आहे… खरतर कुस्तीपटू ना आपला नित्यनियम ाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागतो… त्यामुळे अशा यात्रा आणि जत्रेत भरणाऱ्या कुस्ती स्पर्धांमधून त्यांना बक्षीस च्या माध्यमातून आर्थिक मदत होत होती…मात्र हे कार्यक्रमच रद्द झाल्याने त्यांना हे खर्च भावगवण्यास देखील अडचणी निर्माण होत आहेत…त्यामुळे कमी लोकांच्या उपस्थितीत का होईना या स्पर्धा पुन्हा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील कुस्तीपटू करत आहेत।।।।।।।
