जनतेज न्युज

खासदार प्रतापराव जाधव यांची पत्रकार परिषद

प्रतिनिधी, बुलढाणा : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खामगाव जालना रेल्वे मार्गा संदर्भात आपल्या भाषणात केलेल्या वक्तव्यानंतर तात्काळ बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केलाय रावसाहेब दानवे यांनी सिल्लोड येथील एका कार्यक्रमात खामगाव – जालना रेल्वे मार्ग माझ्या मतदारसंघातून अर्थात जालना जिल्ह्यात एकच रेल्वे स्टेशन येत आहे, आणि केवळ १२ किलोमीटर हा रेल्वे मार्ग जाणार असल्याने या रेल्वे मार्गासाठी ते उत्सुक नसल्याचे बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रासह सर्वच नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले होते. आणि या रेल्वे मार्गाची आशा दुसर होणार असा समज निर्माण झाला होता. मात्र बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी तात्काळ पत्रकार परिषदेचे आयोजन करून, रावसाहेब दानवे यांना आपल्या भाषणातील विधानसंदर्भात स्पष्टीकरण करून देण्याचा आग्रह करणार असून, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची देखील दिल्लीत भेट घेऊन घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोबतच खामगाव – जालना रेल्वे मार्ग नक्कीच होणार असल्याचे आश्वासने त्यांनी यावेळी नागरिकांना दिले आहे.