प्रतिनिधी , पुणे : सिद्धार्थ नगर मधील प्रलंबित झोपडपट्टी पुनर्वसन गेली 14 वर्ष प्रलंबित असून 153 कुटूंब उघड्यावर पडले असून पालिकेच्या भ्रष्ट कारभार विषयी दलित गरीब कुटुंब रासत्यवर आमरण उपोषण करण्यास बसले आहे
पुणे महानगर पालिकेच्या हद्दीतील विमान नगर येथील जागा विकसित करण्यासाठी पालिकेने 14 वर्षा पूर्वी ताब्यात घेऊन येथील 153 कुटुंब दुसऱ्या जागेवर पत्राच्या शेड मध्ये हलवण्यात आले मात्र ही जागा आता खाजगी विकासक अमित लुंकड याने खाजगी गृह प्रकल्प थाटून गरिबांच्या हक्काच्या जमिनीवर स्वतःच्या व्यावसायिक वापरासाठी त्याचा वापर सुरू केला असून, पालिकेच्या2 अनेक आयुक्तांनी या लोकांकडे वेळोवेळी सांगून ही दुर्लक्ष केले..
