जनतेज न्युज

गरीब मुलाला प्लास्टिक सर्जरी साठी गावकऱ्यांनी केली 71हजार रुपयांची आर्थिक मदत…

प्रतिनिधी , बुलडाणा : मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील ग्रामस्थांनी आर्थिक परिस्थितीने हतबल असलेल्या सुमित गवई या तरुणाला वैद्यकिय उपचारासाठी 71 हजार रुपयांची मदत करत माणुसकीचे दर्शन घडवले आहे.गावातील कुठल्याही गोरगरीब व्यक्ति वर आलेल्या प्रत्येक संकटात देऊळगाव माळी येथील गावकरी वेळोवेळी आधार देण्याचे काम करत असतात…
गेल्या महिनाभरापूर्वी सुमित गवई या तरुणाच्या पायाला जखम झाली होती,आणि शेतात रासायनिक खताचा शिरकाव केल्याने त्या खत्यामुळे सुमित च्या पायाला मोठ्याप्रमाणात इन्फेक्शन झाले , त्यामुळे औरंगाबाद येथील डॉक्टरांनी सुमित ला तात्काळ प्लास्टिक सर्जरी करण्याचे सल्ला दिला, अन्यथा मोठा अनर्थ होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला. त्यामुळे सर्जरी साठी लागणारे 50 – 60 हजार रुपये आणायचे कुठून या विचाराने सुमित चिंतेत पडला होता,आणि गेल्या काही दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्याने,गावकऱ्यांनी त्याला आधार देत सुमित च्या प्लास्टिक सर्जरी साठी कैलास राऊत आणि डॉ राहुल गवई यांनी मदतीसाठी आवाहन केले, त्यानुसार सर्वच स्तरातून मदतीचे हात पुढे आले.आणि तब्बल 71 हजार रुपये गोळा करून सुमित च्या स्वाधीन केलेत.आता या पैशातून सुमित च्या पायाची प्लास्टिक सर्जरी होणार आहे.त्यामुळे सुमित ने या सर्व दानशूर नागरिकांचे आभार मानले आहेत…