प्रतिनिधी , जळगाव : केंद्रसरकारने गॅस सिलेंडरच्या किंमती 100 रुपयाने वाढवल्याच्या निषेधार्थ, जळगांव राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतिने अनोख्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले. शहारतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यलयासमोर आकाशवाणी चौकात, चूल पेटवून भाकरी भाजण्यात आल्या. तसेच बस करो महंगाई की मार, मोदी सरकार हाय हाय, अशा घोषणा यावेळी आंदोलनकर्त्या महिलांकडून देण्यात आल्या. कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अशातच गॅस सिलेंडरचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्य लोकांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. यामुळे रस्तावर चूल पेटवून त्यावर भाकरी भाजून केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.
