जनतेज न्युज

घरकुलांची सोडत ऑनलाईन पद्धतीने : महापौर मुरलीधर मोहोळ

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या शुभहस्ते.
पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर लाइव्ह प्रसारण.

प्रतिनिधी , मुंबई : पुणे : ‘पुणे महानगरपालिकेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ५ प्रकल्पासाठीच्या घरकुलांची सोडत ऑनलाईन पद्धतीने घरकुलाचे करण्यात येणार असून पात्र अर्जदारांसाठी दि. २४ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या जुन्या इमारतीतील छत्रपती श्री. शिवाजी महाराज सभागृह येथे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या शुभहस्ते होणार आहे’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

जावडेकर यांच्या शुभहस्ते होणाऱ्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, आमदार चंद्रकांत पाटील यांचीही यावेळी उपस्थिती असणार आहे.

पुणे महानगरपालिकेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ५ प्रकल्पासाठी पारदर्शक सोडत पद्धतीने “परवडणारी घरे ”(Affordabale Housing in Partnership) या घटकाअंतर्गत ही सोडत होणार आहे.

पुणे महानगरपालिकेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेची अमलबजावणी करण्यात येत असून ‘परवडणारी घरे’ या घटका मध्ये खराडी, हडपसर आणि वडगाव येथील ५ प्रकल्पाअंतर्गत एकूण २ हजार ९१८ घरकुलांचे बांधकाम प्रथम टप्यात हाती घेण्यात आले आहे. सदर प्रकल्पांच्या सर्व प्रकल्प अहवालांना केंद्र शासनाची मंजुरी मिळाली आहे.

प्रकल्पाचा तपशील काह्लील प्रमाणे आहे.
अ.क्र. प्रकल्पाचे नाव आणि घरकुलांची संख्या

१. (स.नं.१०६अ) हडपसर : ३४०

२. (स.नं. ५७-५ पार्ट प्लाट नं-१) खराडी : ७८६

३. (स.नं.३९ पार्ट +४० पार्ट) वडगांव खु. : ११०८

४. (स.नं.८९) हडपसर : ५८४

५. (स.नं.१०६ अ १२) हडपसर : १००

एकूण : २ हजार ९१८

महापौर मोहोळ म्हणाले, ‘पुणे महानगरपालिकेमार्फत या प्रकल्पांसाठी जानेवारी २०१७ ते ऑगस्ट २०१७ या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. परवडणारी घरे घटक क्र. ३ या घटकाअंतर्गत प्राप्त झाले असून त्यांची तांत्रिक छाननी पूर्ण झाली असून एकूण २०,००० अर्ज हे तांत्रिकदृष्ट्या वैध आहेत. सदर छाननी अहवाल यादी पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे’.

‘केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोना-१९ महामारी व जमावबंदी या कारणास्तव सदर सोडत ही ऑनलाईन असून नागरिकांना याचे प्रसारण पुणे महानगरपालिकेची अधिकृत संकेतस्थळवर https://pmc.gov.in/ (Face Book Live, You Tube live) या माध्यमातून live प्रसारण पाहता येईल. तरी पात्र अर्जदारांना गर्दी न करता ऑनलाईन सोडत पद्धतीने घरकुलाचे वाटप सोहळ्याचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन महापौर मोहोळ यांनी केले.