जनतेज न्युज

चालत्या ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या हातावर फटका मारून वस्तू चोरणाऱ्या चोरट्याला कल्याण जेआरपी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पोलिसापासून वाचण्यासाठी आरोपीने घेतला होता पोलिसाचा हाताचा चावा

प्रतिनिधी, कल्याण: लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या हातावर काठीचा फटका मारत मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसाच्या तावडीतून सुटण्यासाठी आरोपीने पोलिसाच्या हाताला चावा घेतला मात्र तरीही पोलिसांनी त्याला पकडलेच, अजय अर्जुन कांबळे राहणार होमबाबा टेकडी, पत्रीपूल कल्याण पूर्व असे या चोरट्याचे नाव आहे. कल्याण रेल्वे न्यायालयाने त्याला २४ मार्च पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या चोरट्याच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली.

अंबरनाथ मधील रहिवासी असलेले मनीषा होतीचंदानी हे सोमवारी संध्याकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास मोबाईल हातात पकडून ट्रेनच्या दरवाजात उभे राहून प्रवास करत होते. कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान ट्रॅक क्रॉस करत असल्यामुळे लोकलचा वेग कमी झाल्याचा फायदा घेत ट्रॅकशेजारी उभ्या असलेल्या आरोपीने आपल्या हातातील लाकडी दांड्याचा फटका होतीचंदानी यांच्या हातावर मारला ज्यामुळे त्याच्या हातातील मोबाईल खाली पडला. खाली पडलेला मोबाईल उचलून पळून जाण्याच्या तयारीत चोरटा असतानाच फटका पोईटवर सध्या वेशात तैनात असलेल्या रेल्वे पोलिस शिपाई केदार यांनी त्याला पकडले. पकडले जाताच या चोरट्याने केदार यांच्या हाताचा चावा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या अवस्थेत देखील केदार यांनी त्याला पकडून ठेवले व त्याची झडती घेतली असता त्याच्या कडे मोबाईल सापडल्याला पोलिसांनी लगेचच आरोपीला बेड्या ठोकल्या या आरोपीच्या नावावर टिळकनगर पोलीस ठाण्यात ३ तर खडकपाडा पोलीस ठाण्यात २ गुन्ह्याची नोंद असून या आरोपीला रेल्वे न्यायालयाने २४ मार्च पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.