प्रतिनिधी, सांगली : चिमणी दिनाच्या निमित्ताने मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये घरटे बनवण्याची अनोखी स्पर्धा घेण्यात आली.पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. टाकाऊ वस्तू पासून सूंदर घरटी बनवण्यात आली आहेत.इस्लामपूर येथील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये खेळातून आणि अनुभवातून शिक्षण दिले जाते. तेथे चिमणी दिनाच्या पार्श्वभूमीवर घरटे बनवण्याची स्पर्धा झाली.तयार घरटी शाळेच्या आवारात लावण्यात येणार आहेत. चिमणी हा पक्षी सर्व परिचित असा मानवी वसाहतीजवळ आढळणारा छोटा पक्षी आहे.चिमणीच्या संवर्धनासाठी जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यासारखी चळवळ सुरू आहे. ही चळवळ पुढे नेण्यासाठी स्पर्धा झाली. पालकांनी आपल्या कौशल्याचा वावर करीत रिकामी खोकी,पुठ्ठे,कागदी नळ्या, गवत, कापूस, दोरा, सुतळी, लोकर याचा वापर करून विविध आकारातील घरटी बनवली. याला मुलांची मदत घेतली. विविध रंगछटा वापरून घरटी सजवण्यात आली होती. चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. घरट्यासाठी जागा नसणे हे सर्वात मोठे कारण आहे. चिमणी सहसा मानवी घराजवळ, वळचणीच्या जागेवर घरटे बांधते. मात्र आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमध्ये पक्ष्यांच्या रहिवासासाठी जागाच उपलब्ध नाही. बेफिकीर वृक्षतोडीमुळे चिमण्यांचा घरटे बांधण्यास नैसर्गिक रहिवास व अनुकूल जागांची उपलब्ध कमी झाली आहे. झाडांवर घरटे बांधताना इतर पक्ष्यांशी स्पर्धा करावी लागते. त्यामुळे मुक्तांगणच्या पालकांसाठी स्पर्धा घेत चिमण्यांची घरटी संकलित करण्यात आली आहेत.सौ. स्वाती गोंदकर,डॉ.स्मिता पाटील,श्वेता पाटील,प्रियंका बेकनाळकर,अनुराधा साळोखे,कोमल भिसे, प्रियांका शिंदे, रिया व जय मोहिते वर्षा कांबळे,धनश्री पाटील,भारती उथळे,आरती धोतरे यांनी सहभाग घेतला.
