जनतेज न्युज

चोपड्यात पन्नास हजाराच्या गुटखा जप्त

प्रतिनिधी , जळगाव : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेले गुटखा, पानमसाला, तंबाखूची महाराष्ट्रात छुप्या पद्धतीने सर्रास विक्री सुरू आहे. आज चोपडा शहरात नाशिक येथील सहाय्यक आयुक्त सी डी साळुंके यांच्या पथकाने पाच ठिकाणी छापा टाकला असता, त्यात ५०,४७९ रुपयांचा गुटखा आढळुन आला आहे. हा सर्व गुटखा जप्त करण्यात आला आहे. यामुळे चोपडा शहरात व तालुक्यात गुटखा व पान मसाल्याची विक्री करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.