प्रतिनिधि , औरंगाबाद : जमात ए इस्लामी हिंद महाराष्ट्राच्या वतीने “अंधारातून प्रकाशाकडे ” या शीर्षकाखाली राज्यव्यापी अभियान दिनांक 22 ते 31 जानेवारी 2021 दरम्यान राबविले जात आहे. कोविड- 19 च्या महामारी ने जगातल्या सात अब्ज लोकांमध्ये अध्यात्मिक ओढ निर्माण केलेली आहे. कोरोना महारोगाच्या छायेत शारीरिक अंतर पाहतांना समाज महामारी मुक्त करताना समाजातील विविध क्षेत्रात पसरलेल्या घनघोर अंधार कसे दूर करता येईल आणि उज्वल वर्तमान आणि भविष्य साठी अखंड प्रकाश कसा तेजोमय राहील हा संदेश या अभियानाद्वारे दिले जाणार असल्याचे जमात ए इस्लामी हिंद ने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
