प्रतिनिधी : पुणे , जागतिक अपंग दिनानिमित्त सह्याद्री सेवा संघातर्फे येरवडा येथील शासकीय बहुउद्देशिय अपंग संमिश्र केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना फळे वाटप सह्याद्री सेवा संघाचे अध्यक्ष अक्षयभाऊ कोठावळे यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी प्रफुल काकडे , निलेश जाधव , नरेश फाळके , शुभम चव्हाण , कारागृहाचे माजी सुभेदार बाबुराव कांबळे , प्रशांत फुले व शंकर जोग उपस्थित होते .
