प्रतिनिधी , जळगाव : आज जागतिक एड्स दिनानिमित्त जळगाव जिल्ह्यातील कानळदे येथे HIV सह जिवन जगणार्या दोन जोड्या चा विवाह संपन्न झाला
कानळदे येथील सेवावृत्त पोलीस उपअधीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी या विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते सपकाळे हे गेले बारा वर्षे जागतिक एड्स दिनानिमित्त एचआयव्ही सह जिवन जगणार्या जोडप्याचा विवाह सोहळा आयोजित करत आहेत ,आज पर्यंत एचआयव्ही सह जिवन जगणार्या २१विवाह करून दिले आहेत, आज ज्या दोन जोड्या विवाह संपन्न झाला ते कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील आहेत, समारंभ साठी जिल्हा एड्स नियंत्रण संस्था ,आधार बहुउद्देशीय संस्था, विहान काळजी व आधार केंद्र व NMPप्लस पुणे यांचे सहकार्य लाभले, या विवाह प्रसंगी भाजपचे आमदार राजू भोळे चोपड्याचे डि वाय एस पी राजू रायसोनी उपस्थित होते
