प्रतिनिधी, मुंबई : जागतिक चिमणी दिनाच्या सर्वांना चिमणी आणि इतर पक्षी जगत्तातील सगळ्यांना शुभेच्छा, शेतावर बांधावर गावाकडे अगदी शहार मध्ये दिसणाऱ्या या चिमण्या आपल्या जीवनाचा एक भाग असलेल्या अगदी सुरुवाती पासून या आपल्या चिऊ ताई. चिमणी दिनाच्या निमित्ताने चिमण्यांचा संगोपन आणि संवर्धन करण या विषयची जनजागृती लोकमानसात निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. सर्वप्रथम हा दिवस साजरा केला २०१० साली. त्यावेळी nature for everyone या संस्थेचा मोहमद दिलावर यांनी या दिवसाची सुरुवात केली. आणि मग जणू हा दिवस साजरा करण्याचं लोण जग भर पसरलं. अलीकडे गेल्या २ दशका पासून खासकरून आपल्या मुंबईतील काही उपनगरात चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसू लागली अर्थात काही उपनगराण मध्ये अजूनही चिमण्यांची संख्या चांगली आहे परंतु काही उपनगरात चिमण्या दिसेनाश्या झाल्या. या चिमणी दिवसाच्या निमित्ताने याच घोष वाक्य जे आहे I love sparo. आता ही चिमण्यांची संख्या कमी का व्हायला लागली. कारण चिमण्याना आता घरटे बंधण्या साठी योग्य अशी झाडे नाहीत त्याच बरोबर चिमण्या च अन्न असलेले कीटक ,किडे आळ्या धान्य यांची उपलब्धताही हळू हळू कमी व्हायला लागली कर्कश आवाज, कलकलाट आणि शहरीकरना मुळे जणू चिमण्या व इतर पक्षांचा अधिवास आक्रसत गेला.
