जनतेज न्युज

जे मला धमकवण्याचा प्रयत्न करतायेत त्यांचा मी बाप आहे – संजय राऊत

प्रतिनिधी , मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली आहे.याचं धर्तीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दादरमधील शिवसेना भवनात पत्रकार परिषद आयोजित केली होती.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भाजपवर टिकास्त्र उगारलं.भाजप सुडाचं राजकारण करत असल्याचं ते यावेळी म्हणाले.

पूर्वी सीबीआय आणि ईडीची नोटीस येणं ही मोठी घटना समजली जायची.मात्र,आता ईडीच्या आणि सीबीआयच्या नोटीसींना कोणीही गांभीर्याने घेत नाही,असंही ते यावेळी म्हणाले.

याचसोबत बायका-पोरांवर कारवाई करणाऱ्यांना नामर्दांगी म्हणतात,असा इशारा त्यांनी भाजपला दिला.

यानंतर त्यांनी, कालच मी देवेंद्र फडणवीसांनी केलेलं ऐतिहासिक विधान ऐकलं, ते म्हणाले जर आपण काही केलं नसेल तर घाबरायचं कारण नाही,सर्व काही त्यांनी करायचं आणि आम्ही घाबरायचं असं आम्ही करणार नाही,असं संजय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ईडी कार्यालयात भाजपने डेस्क टाकलंय.भाजपचे काही नेते सतत ईडी कार्यालयात येतात-जातात.माझ्याकडे पुरावे आहेत,असा खुलासाही त्यांनी केला आहे.

जे मला धमकवण्याचा प्रयत्न करतायेत त्यांचा मी बाप आहे,अश्या रोषात त्यांनी भाजपला धारेवर धरलं.

दहा वर्षांपूर्वी माझ्या पत्नीने ५० लाखांचं कर्ज घेतले होते. मात्र,त्यांची नोटीस आज पाठवणं म्हणजे १० वर्षानंतर ईडीला जाग आली आहे.याचा अर्थ जर सरकार कारस्थाने करून पडत नसेल तर ईडीद्वारे पडण्याचा डाव भाजप वाल्यांनी आखला आहे,असे मत संजय राऊत यांनी मांडले.

याचबरोबर ‘मी जर तोंड उघडलं तर केंद्रातील नेत्यांना हादरे बसतील,असा इशाराही त्यांनी दिला.