प्रतिनिधी , मुंबई : उध्दव ठाकरेंची बेनामी संपत्ती अन्वय नाईक यांच्या नावावर असुन १ एप्रिल २०१३ पासुन ३१ मार्च २०२१ पर्यंतचा संपत्ती कर हा १२ नोव्हेंबर २०२० ला अन्वय नाईक यांच्या नावाने, रश्मी ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांच्या खात्यातुन ट्रांसफर करण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच उध्दव ठाकरे यांच्याकडे या बाबत उत्तर मागितले आहे.
