प्रतिनिधी, औरंगाबाद : शहरातील पैठण गेट परिसरात डावी आघाडी संघटनेच्या वतीने पैठण गेट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धरणे आंदोलन आज रोजी करण्यात आले आहे.यावेळी समाजासाठी लढणाऱ्या नेत्यांची समाजसेवकांची हत्या करण्यात येते व त्यांचे आरोपींना अजून पर्यंत अटक होत नाही या घटनेचा ही निषेध करण्यात आला आहे.समाजसेविका तिस्ता शितलवाड यांना डावी आघाडी संघटनांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आल्याची माहिती ही माध्यमांशी बोलताना देण्यात आली आहे.देशात सुरू असलेल्या विविध घटनांचा यावेळी निश्चित करण्यात आला.यावेळी संघटनेचे नेतृत्वाखाली सदरील आंदोलन करण्यात आले असून यावेळी सदरील संघटनेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
