प्रतिनिधी : पुणे , हैदराबाद येथे घडलेल्या डॉ प्रियांका रेड्डी यांच्या हत्येचा जाहीर निषेध व डॉ प्रियांका यांना पुणे कॅम्पभागातील ट्राय हॉटेल चौकात सर्व पक्षीय निषेध सभा घेऊन, मेणबत्त्या पेटवून श्रध्दांजली वाहण्यात आली . यावेळी उपस्थित लोकांनी मेणबत्त्या पेटवून श्रध्दांजली वाहण्यात आली . या कार्यक्रमाचे आयोजन जयकुमार राघवचारी यांनी केले होते .
यावेळी उपस्थितांनी , लोकांची मानसिकता बदलण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे . महिलांना योग्य सुरक्षा मिळाली पाहिजे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी केली .
यामध्ये भोलासिंग अरोरा , जयकुमार राघवचारी , मनजितसिंग विरदी , मुस्ताक अहमद , शाहिद शेख , अमित मोरे , जितेंद्र शिंदे , गायक कैलाशकुमार ,किशोर शिंगवी , रमेश मारी , किरण कांबळे , तन्वीर सय्यद , नरेश जाधव , सोमेश खरात , विक्रम गोहेर , दीपक उमंदे , दीपक वैराट , कव्वाल सुलतान नाजा , सांची शिंगवी , प्रभू बाळकृष्ण महाराज , चंद्रकांत काळे , अरविंद गाडे , ज्ञानेश्वर नागे , संजय सावंत , सोहेल शेख , उत्तम सावंत , गोविंद स्वामी व मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते .
