गणेश मंदिरात रंगलेल्या दिपोत्स्वावर करोनाचे सावट कायम
प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरा पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते. आपल्या प्रत्येक सण आणि संस्कृती मागे खास उद्देश असतो. कार्तिक पूर्णिमादेखील आपल्याला दान धर्माची शिकावण देते. देशभरात विविध नावांनी कार्तिक पौर्णिमा ओळखली जाते.कार्तिकी पौर्णिमेदिवशी शंकर भगवानांनी त्रिपुरासुर राक्षसाचा वध केल्याची आख्यायिका आहे. या दिवसाला त्रिपुरा पौर्णिमा असेदेखील म्हटलं जातं. या दिवशी भगवान शंकराची खास आराधना केली जाते. त्यांना प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली जाते. कार्तिकी पौर्णिमेदिवशी देखील दीपदान करण्याची प्रथा आहे. दरवर्षी प्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त डोंबिवलीच्या आराध्य दैवत असलेल्या गणेश मंदिरात रंगलेल्या दिपोत्सवावर कोरोनाचे सावट दिसले. दिपोत्सवाच्या निमित्ताने मागील 8 महिन्या नंतर प्रथमच गणेश मंदिरात उत्सवाचे आयोजन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टच्या वतीने दरवर्षी प्रमाणे आज दीप दानयज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या निमित्ताने नागरिकाकडून दरवर्षीपेक्षा अतिशय कमी प्रमाणात खाद्यतेलाचे दान करण्यात आले. मंडळाने देखील दरवर्षी प्रमाणे मंदिर परिसराची दिव्याच्या लखलखाटात सजावट करण्याऐवजी 200 दिवे लावण्यात आले आहे. या दानयज्ञात मिळालेले तेल वृद्धाश्रम, गरजू व्यक्तीना दान केले जाणार आहे. संस्कृती जपत जमा झालेल्या तेलाचे दान करत मानवतेच संदेश देण्याचा यंदाही प्रयत्न करणार असल्याचे आयोजकाकडून सांगण्यात आले.
