प्रतिनिधी , पुणे- कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर राज्यसरकारने लॉकडाउन जाहीर केला होता. यामध्ये कलाकारांचे बरेच हाल झाले. मात्र, सोशल डिस्टन्सिंगमध्ये कार्यक्रम करण्याची परवानगी दयावी, अशी मागणी कलाकारांनी केली होती. याबाबत आंदोलन देखील करण्यात आलं होतं.त्यामुळे आता कुठे तरी लावणीकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. आता 50 टक्केच्या उपस्थितीत लावणी सादर करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. म्हणून बालगंधर्व तब्बल 10 महिन्यांनी गाजला आहे.
