आठगाव ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यानची घटना दोन आरोपी गजाआड
प्रतिनिधी , कसारा : महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे . मध्य रेल्वेच्या आठगाव ते कसारा या रेल्वे स्थानकादरम्यान लोकल प्रवास करनारया तरुणीचा दोन मद्यधुंद तरुणांनी चालत्या लोकलमध्ये विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या तरुणीने प्रतिकार केला असता त्यांनी तिला चक्क चालत्या ट्रेन मधून ढकलून देण्याचा प्रयत्न केला .सुदैवाने तोपर्यंत लोकल कसारा रेल्वे स्थानकात पोहचल्याने तरुणीचा जीव वाचला. लोकल स्थानकात थांबताच यातील एका तरुणांने पळ काढला मात्र दुसऱ्या तरुणाला तिच्या नातेवाईकानी पकडुन रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले . या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करन्यात आला असून पोलिसांनी दोन्ही तरुणांना अटक केली आहे .अमोल जाधव आणि अमन हिले अशी या आरोपींची नावे आहेत.
व्हीओ : कसारा येथे राहणारी 21 वर्षीय तरुणी ठाण्यातील मॉल मध्ये वरिष्ठ पदावर काम करते. 25 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सदर तरुणी ठाणे येथून कामावरून परतत होती . यावेळी लोकलमधील डब्यात अनेक महिला होत्या.मात्र आठगाव स्थानकापर्यंत लककल मधील सर्व महिला उतरून गेल्याने ही तरुणी लोकल मध्ये एकटीच होती. हे पाहून दोन तरुण चालत्या लोकल मध्ये चढले. दोघेही दारुच्या नशेत होते. या दोघांचे हावभाव पाहून तरुणी घाबरली होती. मात्र प्रसंगावधान राखत तिने मोबाईल वर दोघांचेही फोटो काढत ते तिने तिच्या नातेवाईकांना पाठविले.बया दरम्यान या दोघांनी तरुणीची छेड काढण्यास सुरुवात करताच या तरुणींने त्यांना प्रतिकार केला. तरुणीकडे झालेल्या विरोधामुळे संतापलेल्या मद्यधुंद तरुणांनी तिला धावत्या लोकलमधून बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न केला मात्र याच वेळी सुदैवाने लोकल कसारा रेल्वे स्थानकात पोहचली . तिचे नातेवाईक रेल्वे स्थानकावर वाट पाहत थांबले होते यामुळे डेअरिंग करत या तरुणाने यातील एकाला घट्ट पकडून ठेवले. लोकल थांबताच पीडितेच्या नातेवाईकानी त्याला ताब्यात घेत पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र त्याचा साथीदार निसटला .या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करन्यात आला असून पकडलेल्या तरुणांकडे माहितीच्या आधारे दुसऱ्या तरुणाला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत
