जनतेज न्युज

तुकडोजी महाराजांना भारतरत्न द्या अन्यथा आंदोलन करु;सत्यपाल महाराजांचा सरकार ला ईशारा…

प्रतिनिधी , अखिल विश्वाला मानवतेचे देणारे व सर्व धर्म समभावाची शिकवण देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना तात्काळ भारतरत्न पुरस्कार द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी सरकार ला दिला आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५२ व्या पुण्यतिथी निमित्त गुरुदेव भक्त आक्रमक झाले आहे.त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रसंत युवक मंच व गुरुदेव भाविकांच्या वतीने आज तुकडोजी महाराज यांच्या महासमाधी समोर नारे लावत ही भारत रत्न देण्याची मागणी करण्यात आली.
तुकडोजी महाराज यांना भारतरत्न सन्मान द्यावा यासाठी मागील कित्येक वर्षांपासून गुरुदेव भक्तांनी लढा उभारला आहे. परंतु अद्यापही राज्य सरकार व केंद्र सरकारने कुठलीही दखल घेतली नसल्याचा आरोप गुरुदेव भाविकांनी केला आहे.त्यामुळे आज पासून लाखो गुरुदेव भाविक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तुकडोजी महाराजांना भारत रत्न देण्याची मागणी करणार आहे.दरम्यान तात्काळ भारतरत्न पुरस्कार न दिल्याच तीव्र आंदोलनाचा ईशारा गुरुदेव भाविकांनी दिला आहे…