प्रथिनिधी, उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील दारफळ हे अत्यंत छोट खेडेगाव . या गावातील संभाजी इंगळे यांना तीन मुली एक मुलगा . स्वतःचे शिक्षण पुर्ण झाले नाही म्हणुन संभाजी इंगळे यांनी ५ एक्कर जमीनीत काबाडकष्ट करून वेळप्रसंगी व्याजाने पैसे काढूण मुलगा – मुलगी भेदभाव न मानता दोन मुलींना स्पर्धा परिक्षेला प्रोत्साहन देत पीएसआय बनवले . यामुळे हे इंगळे कुंटूब समाजाचे आदर्श ठरले आहे . वडिलांची इच्छा व कष्ठ लक्षात घेऊन मोठी मुलगी संजीवणीने स्वतःसह भावंडाच्या शिक्षणासाठी कष्ठ घेतले . शेतात मजुर न लावता आई – वडिलासोबत सर्व भावंडांनी कष्ठ करून आभ्यास केला .वडील यांचा आदर्श व मोठया बहीनीच्या मार्गदर्शनाखाली भ्रष्टाच्यारमुक्त कार्य करणार असुन ज्या पद्धतीने तत्कालील जि प मुख्यकार्यकारी अधिकारी रायते यांचे सहकार्य लाभले त्यांच्या आदर्शाप्रमाणे समाजातील विद्यार्थांना मदत करणार असल्याचे मत सरोजनी इंगळे यांनी व्यक्त केले . यावेळी त्यांना भावना आनावर झाल्या होत्या तर किरकोळ बचत व आत्मविश्वास यश देतो त्यामुळे कष्ठ केल्यास फळ मिळते असे त्यांनी सांगीतले .
