प्रतिनिधी : कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांनी गेले अनेक दिवसांपासून राजधानी दिल्लीला वेढा घातलाय. केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी विरोधातील कायदे तात्काळ मागे घेण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोनाविषयी धुळ्यातील गुरुद्वारा चे प्रमुख धीरज सिंग यांनी सांगितले की, देशातील शेतकरी खुश, तर संपूर्ण देश खुश राहील. मोदी सरकारने शेतकऱ्यांना तत्त्कळून न ठेवता जे शेतकरी विरोधी कायदे आहेत ते मागे घेण्यात यावे. मोदी सरकारने शेतकऱ्यांना समजण्या पेक्षा स्वतः सामंजस्याची भूमिका घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी भूमिका धुळे येथील गुरुद्वाराचे प्रमुख धीरज सिंग यांनी व्यक्त केली.
